Friday, June 9, 2023

रद्द करण्यात आलेली नांदेड- रोटेगाव डेमू रेल्वे ‘या’ तारखेपासून पुर्ववत धावणार 

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेने मनमानी कारभार करत नांदेड- रोटेगाव रद्द केली होती. परंतु आता प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नुकतीच रद्द केलेली नांदेड– रोटेगाव डेमू विशेष गाडी पूर्ववत केली असून तिचा विस्तार मनमाड पर्यंत केला आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. एका परिपत्रकाद्वारे दमरेने ही माहिती दिली आहे.

दमरेने दिलेल्या माहितीनुसार गाडी संख्या 07777 हुजूर साहिब नांदेड ते मनमाड डेमू रेल्वे दि. 26 नोव्हेंबर 2021 पासून हुजूर साहिब नांदेड येथून सायंकाळी 19:25 वाजता सुटेल आणि परभणी, औरंगाबाद, रोटेगाव मार्गे मनमाड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 05:50 वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07778 मनमाड ते हुजूर साहिब नांदेड डेमू रेल्वे दि. 27 नोव्हेंबर 2021 पासून मनमाड येथून दररोज सकाळी 06:10 वाजता सुटेल आणि रोटेगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुपारी 15:20 वाजता पोहोचेल.

या गाडीला दोन्ही दिशेने लिंबगाव, चुडावा, पुर्णा जंक्शन, मिरखेल, पिंगळी, परभणी जंक्शन, पेडगाल, देवलगाव अवचार, मानवत रोड, सेलू, सातोना, उस्मानपुर, परतूर, रांजणी, कोडी, जालना, बदनापूर, करमाड, चिकलठाणा, मुकुंदवाडी, औरंगाबाद, दौलताबाद, पोटूल, लासूर, करंजगाव, परसोडा, रोटेगाव, तारुर, नागरसोल, अंकाई या रेल्वे स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.