केंद्र शासन विकणार ‘या’ महत्त्वाच्या कंपनीमधील आपला हिस्सा, टाटा-महिंद्रा सारख्या मोठ्या कंपन्या हिस्सा विकत घेण्यासाठी रांगेत

नवी दिल्ली | बीईएमएल या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शस्रास्राची निर्मिती करणाऱ्या या कंपनीमधील आपला हिस्सा केद्रासरकार विकणार आहे. ही घोषणा सरकारने केल्यानंतर तिला खरेदी करण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या रांगेत उभ्या आहेत. यामध्ये टाटा, महिंद्रा, अशोक लेलंड लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या मोठ्या कंपन्या रांगेमध्ये आहेत.

आपल्या उत्पादन व्यवसायामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी टाटा, महिंद्रा, अशोक लेलँड यासारख्या मोठ्या कंपन्या BEML या कंपनीला खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. याच्या खरेदीमधून वाहन उत्पादनातील त्यांची निर्भरता कमी होणार आहे. यामुळे या कंपन्या या खरेदीमध्ये उत्सुक आहेत. याबाबत लाइव्ह मिंटने बातमी दिली आहे.

BEML या कंपनीमध्ये सरकारचा जवळपास 54 टक्के हिस्सा आहे. सरकारने या भागाच्या लिलावासाठी 4 जानेवारी रोजी अर्ज मागितले होते. त्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट जमा करण्याची शेवटची तारीख 1 मार्च वाढवून 22 मार्च केली आहे. BEML ही कंपनी पृथ्वी मिसाईल लाँचर, आर्मी ट्रान्सपोर्ट वेहिकल, रेल्वे – मेट्रोच्या डब्याची निर्मिती, मायनिंग, कन्स्ट्रक्शन, डिफेन्स आणि एरोस्पेस या क्षेत्रात काम करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.