सर्वात स्वस्त फोन ‘ONE PLUS Nord’ आज होणार लॉन्च, काय आहेत फीचर्स पहा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोबाईल वापरकर्त्यांनसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारात नेहमी वेगवेगळे फीचर्स असलेले नवीन मॉडेल चे मोबाइल बाजारात येतात. अश्याच प्रकारचा स्वस्त आणि खास फिचर्सने बनवलेला “वन-प्लस नॉर्ड ” स्मार्टफोन आज लॉन्च होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन युजर्स आतुरतेने वाट पाहत होते. वन- प्लस आज आपला नवीन फीचर्स असलेला ‘Nord’ फोन लॉन्च करणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे हा फोन कमी बजेट मध्ये ग्राहकांना वापरायला मिळणार आहे.

या फोनचं लॉन्चिंग गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या OnePlus Nord AR अँप च्या द्वारे संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी लॉन्च करण्यात येणार आहे. नवीन लॉन्च होत असलेला ‘वन-प्लस नॉर्ड ‘ हा या मोबाईल ची तुलना काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या ‘विवो व्ही १९’ या मोबाइल सोबत केली जात आहे.

OnePlus Nord चे स्पेसिफिकेशन्स जास्त आहे. तर यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट, 6 जीबी रॅन, 6.65 इंच स्क्रीन आणि 3 रियर कॅमेरा असणार आहेत. फोटो शूट साठी यामध्ये 48MP + 8MP + 2MP+2MP असे कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 32MP+ 8MP चे दोन कॅमेरे देण्यात आला आहे..हँडसेटमध्ये स्क्रिनवर एक पंच-होल कटआउट असणार आहे. हा फोन ड्युअल फ्रंट कॅमेऱ्यासोबत लॉन्च करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त यामध्ये पॉवरफुल बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे. असं सांगण्यात येत आहे की, नव्या OnePlus Nord ची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत असू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.