मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फटकेबाजी केली. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजिक्य वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या गोटात आनंद होईल असं वक्तव्य केलं. कारण रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.

इतकंच नाही तर मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता”

Leave a Comment