शहर बसने एकाच दिवसात तब्बल 13 हजार प्रवाशांनी केला प्रवास

smart city bus 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोना संसर्ग व त्यामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली स्मार्ट शहर बस संसर्ग कमी होताच निर्बंध शिथिल होत असताना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. हळूहळू शहर बस पूर्वपदावर येत असतानाच सोमवारी एकाच दिवसात शहर बसला तब्बल 13 हजार प्रवासी मिळाले आहेत.

स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ने 100 शहर बस खरेदी केल्या आहेत. मात्र कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही बस सेवा ठप्प होती. आता दुसरी लाट संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसची संख्या वाढविली जात आहे. सध्या औरंगाबाद शहरात विविध मार्गांवर स्मार्ट सिटी तसेच या 50 शहर बस सुरू करण्यात आल्या आहेत. हळूहळू शहर बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. सोमवारी तब्बल 13 हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला प्रवाशांनी मास टायगर चा वापर करून तसेच शासनाने ठरवून दिलेल्या कॉमेडीच्या नियमांचे पालन करून स्मार्ट शहर बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.

सात महिने ठप्प होती शहर बस –
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत लोक डाऊन मुळे तब्बल सात महिने स्मार्ट बस बंद होती. त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा बस सेवा बंद करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ने घेतला. परंतु आता दुसरी लाट ओसरल्यानंतर 7 घेऊन पासून सिटी बस पुन्हा एकदा शहरवासीयांचा सेवेत दाखल झाली आहे. दरम्यान, ऑगस्ट महिना आणि त्यातच मराठी श्रावण महिन्यात विविध सण असल्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे स्मार्ट सिटी अभियानाच्या वाहतूक विभागातर्फे कळविण्यात आले आहे.