शहरात होणार 11 आधुनिक रुग्णालये; स्मार्ट हेल्थ अंतर्गत उपक्रम

औरंगाबाद – स्मार्ट सिटी प्रशासनाने शहरातील घाटी रुग्णालय यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटीतून तब्बल 40 कोटी रुपये खर्च करून आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. याअंतर्गत शहरातील आंबेडकर नगर, सिडको एन 2 कम्युनिटी सेंटर जवळ 10 कोटी रुपये खर्च करून दोन मोठी रुग्णालये उभारण्यात येतील. तसेच गजानन नगरातही 2 कोटींचे एक रुग्णालय उभारण्याचा मानस स्मार्ट सिटी चे सीईओ असते कुमार पांडे यांनी व्यक्त केला.

पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार स्मार्ट हेल्थ उपक्रमाअंतर्गत सातारा, देवळाई इटखेडा, हर्षनगर येथे प्रत्येकी 75 लाख रुपये खर्चून आरोग्य केंद्रे उभारण्यात येतील. नवीन आरोग्य केंद्रांसाठी अनेक ठिकाणी जागा नाही. त्यामुळे मिसारवाडी, मुकुंदवाडी, गरमपाणी, राजनगर, अंबिका नगर, जय भवानी नगर, पुंडलिक नगर या भागात जागांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य केंद्रांचा काही इमारती देखील मोडकळीस आल्या आहेत. आरोग्य यंत्रणा मजबूत करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही लागणार आहे. केंद्राची उभारणी सुरू होताच मनुष्यबळाचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन केंद्रांसाठी मनुष्यबळ पुरवण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

या ठिकाणी होणार रुग्णालये –
आंबेडकर नगरात 5 कोटींचे रुग्णालय, सातारा देवळाई ईटखेड्यात तीन रुग्णालय, तसेच 14 आरोग्य केंद्रांचे नुतनीकरण होणार असून सात रुग्णालयांसाठी जागांचा शोध सुरू आहे. त्याचप्रमाणे सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, बन्सीलाल नगर, सिडको एन 8, राज नगर, चिकलठाणा, जवाहर कॉलनी, नेहरू नगर, पदमपुरा, औरंगपुरा, जुना बाजार, मुकुंदवाडी, औषधी भांडारासाठी इमारत उभारण्यात येणार आहे.

You might also like