Video : नव्या कोऱ्या i20 चारचाकी गाडीवर नारळाचे झाड कोसळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील चाफळ व परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसात अनेक झाडे उन्मळून पडली. पावसात उभी असलेल्या एका नव्या कोऱ्या आय ट्वेन्टी (i20) या चारचाकीवर एक नारळाचे झाड कोसळले. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चाफळ (ता. पाटण) येथील सुरेश देवकर यांनी काही दिवसापूर्वीच घेतलेली नवीनच चारचाकी आय ट्वेन्टी (i20) गाडीवर नारळाचे भले मोठे झाड कोसळले. गाडीवर झाड पडल्यानंतर गाडीचे मोठे नुकसान झाल्याने अर्थिक नुकसानही मोठे झाले आहे. झाड कोसळल्याने गाडीचा वरील भागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने गाडीत कोणी नसल्याने जखमी अथवा जीवीतहानी झालेली नाही.

झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूकीस अडथळा

वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह बाजाराला आलेल्याचीही चांगलीच तारांबळ उडाली. वादळी पावसाचा फटका चाफळसह विभागातील पाडळोशी, केळोली, दाढोली, धायटी, चव्हाणवाडी, जाळगेवाडी, नानेगाव, माजगाव या गावांना बसला. वादळी वाऱ्याने शिवारात अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली. तर काही ठिकाणी रस्त्याकडेच्या झाडांच्या फांद्या वादळी वाऱ्याने तुटून रस्त्यावर पडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

Leave a Comment