औरंगाबाद | दारूच्या नशेमध्ये असलेल्या एका तरुणीने माझा भाऊ पोलीस अधिकारी आहे म्हणत सिडको बस स्थानक येथे गोंधळ घातला. ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. नशेत असतानाच तिला एकाने बस स्थानका बाहेर आणून सोडले होते आणि तो तेथून गेला होता.
त्यानंतर ती माझा भाऊ पोलीस निरीक्षक आहे, सीपी साहेब माझ्या ओळखीचे आहेत अशी बडबडत होती. यावेळी तिने बराच गोंधळ घातला. बस स्थानकावरील प्रवाशांची मोबाईल द्वारे ती शुटींग काढत होती. त्यानंतर ती सुलभ शौचालय कडे गेली आणि कर्मचाऱ्यांना शौचालय स्वच्छ ठेवत जा अशा सूचना देत होती. दरम्यान तिचा गोंधळ पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती.
दरम्यान, निर्मला निंभोरे यांच्या दामिनी पथकाने आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे बीट मार्शल यांनी तात्काळ धाव घेतली. पोलिसांना पाहताच त्या युवतीला ही माझी नातेवाईक आहे असे म्हणत एक युवक रिक्षाने घेऊन गेला. सदर युवतीला सोडायला आलेल्या शोध घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.