दोन दिवसात वसाहतींचे सर्वेक्षण करून कंटेनमेंट झोन तयार करणार ; केंद्रीय समितीच्या सूचनेनंतर मनपाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती शहरात आली आहे या समितीच्या सूचना प्रमाणे येत्या दोन दिवसात वसाहतींचे सर्वेक्षण करून कंटेनमेंट झोन तयार केले जाणार असून त्यांना शीलहि केले जाणार आहे.

अत्यावश्यक सेवा संचालक तथा केंद्रीय प्रथम प्रमुख डॉ.रवींद्रन यांच्या पथकाने शहर आणि जिल्ह्यातील करुणा आजाराचा आढावा घेतला.याच शहरात गेल्या वर्षी रुग्ण वाढत असताना ज्या उपाययोजना केल्या त्याचा गुन्हा करण्याची सूचना त्यांनी केली पालिकेचे क्वारंटाईन सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.तसेच पथकाने चाचण्या वाढवण्याची सूचना केली त्यानुसार रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांसाठी दहा पथके तयार केली आहेत. ज्यात अँटीजन टेस्ट ही दोन हजाराच्या पुढे केल्याची माहिती डॉक्टर नीता पाडळकर यांनी दिली.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मनपात ट्रेसिंग, ट्रेकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट करण्यात येत होती. हिच पद्धत पुन्हा यावेळी उपयोगात आणणार आहेत. कोरोना रुग्ण वाढत असलेल्या वसाहतींचे आगामी दोन दिवसात मनपा आरोग्य अधिकारी, प्रभाग अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांच्या मदतीने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर त्याचे मॅपिंग तयार करून अधिक रुग्ण वाढत असलेल्या वसाहती कंटेनमेंट घेऊन घोषित करून सील केला जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment