Wednesday, February 8, 2023

कंत्राटदाराला दलालवाडीतील नाल्यावर कचरा न काढता पुल बांधण्याची घाई

- Advertisement -

औरंगाबाद : सध्या पावसाळा सुरु झाला असून रस्तावरील खड्ड्यामध्ये पाणी साचते. ते पाणी घरात येऊ नये म्हणून दलाल वाडीतील औषधीभवन येथील नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्या चे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदाराने नाल्यातील कचरा न काढताच बांधकाम सुरू केले आहे.

शासनाने दिलेल्या निधीतून दलाल वाडीतील औषधी भवन नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. परंतु नाल्यामध्ये अनेक वर्षापासून साचलेला कचरा साफ न करता बांधकाम सुरू केले असून याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. दलालवाडी भागात असलेल्या नाल्यामध्ये थर्माकोलचे तुकडे, औषधांचे बॉक्स, प्लास्टिक बॅग असा कचरा बऱ्याच वर्षापासून पडलेला आहे. पावसामुळे या भागात आणि नाल्यात भरपूर पाणी आणि कचरा पडून राहिल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा उच्छाद वाढतो.

- Advertisement -

दरवर्षी पावसाळ्यात फकीरवाडी, चुनाभट्टी, दलालवाडी, न्यू गुलमंडी रोड या परिसरातील हजारो घरांमध्ये पाणी शिरून फजिती उडते. अनेक वर्षापासून ही समस्या दूर करणे गरजेचे होते. परंतु पस्तीस वर्षात एकदाही या नाल्याची पूर्णपणे स्वच्छता झालेली नाही. यामुळे दुर्गंधी आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे.