Tuesday, January 31, 2023

सोलापुरात देवाच्या रंगपंचमीला ही कोरोनाचा फटका ; रंगपंचमीला विठ्ठल-रुख्मिणीलाही रंग नाही

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरी केली जाणारी रंगपंचमी यावर्षी कोरोना व्हायसरच्या भीतीने मंदिर समितीने रद्द केली आहे. मात्र देवाच्या अंगाला नैसर्गिक रंग लावून रंगपंचमी न खेळता फक्त डफाची मिरवणूक काढली. कोरोना व्हायरसमुळे गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली रंगपंचमीचा फटका यावर्षी साक्षात विठुरायालाही बसला आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचे लोण पसरु लागला आहे. विशेष दक्षता म्हणून सार्वजनिक कार्यक्रम रद्द कऱण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंदिर समितीने विठ्ठल मंदिरात साजरा केला जाणारा रंगोत्सव रद्द करत केवळ विठ्ठल व रुक्मिणी मातेला नैसर्गिक रंग लावून साध्या पध्दतीने रंगपंची साजरी केली.

- Advertisement -

वसंतपंचमी ते रंगपंचमी दरम्यान विठ्ठलाला दररोज पांढरा पोषाख परिधान केला जातो. त्यावर गुलाल टाकून देवाची पूजा केली जाते. त्यामुळे कोरोना व्हायरचा फटका साक्षता भगवंत विठ्ठलालाही बसला आहे.