राज्यभरामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये ST बसेसचा मोलाचा वाटा आहे. आजदेखील गावखेडी आणि वाड्यावस्त्यांवर ST ची सेवा पुरवली जाते. त्यामुळे दुर्गम भागातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होत असतो. आता परिवहन महामंडळातील बसेसनी कात टाकायला सुरुवात केली असून ST च्या थंडगार आणि इलेकट्रीक बसेसचा सुद्धा समावेश झाला आहे. त्यामुळे ST वर रुसलेला प्रवासी पुन्हा ST कडे वळू लागला आहे. अशातच आता येत्या दोन वर्षात 11,260 गाड्या येणार ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे.
यामध्ये 5250 इलेक्ट्रिक बस चा समावेश आहे. यातील काही गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर उरलेल्या गाड्या ह्या लवकरच दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबई सह राज्यातील एसटी बसची सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
तसे पाहायला गेल्यास एसटीच्या पूर्वी 18000 बस गाड्या होत्या. मात्र त्यातील काही गाड्या ह्या मोडकळीस आल्यामुळे, त्यांचे आयुर्मान संपल्यामुळे रद्द करण्यात आल्या, भंगारात काढण्यात आल्या. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 14000 बसेस आहेत. मात्र आता यामध्ये आणखी गाड्यांची भर पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामंडळांना इलेक्ट्रिक बसेस सोबतच साध्या गाड्या वाढवण्यावर सुद्धा भर दिलाय. टप्प्याटप्प्याने राज्यात 5150 इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. त्यापैकी 60 बस आधीच एसटी मंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झाले आहेत. ई शिवनेरीच्या शंभर बस पैकी 86 बसेस ताफ्यात आहेत. तर उर्वरित बस काही दिवसात येणार आहेत. शिवाय डिझेलवर चालणाऱ्या 6000 गाड्या येणार आहेत. यातील 2200 बसची वर्क ऑर्डर झाली असून टप्प्याने बसेस ताब्यात येणार आहेत. याशिवाय 2500 बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. 1310 साध्या बस खाजगी भाड्याने घेणार असून याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत या गाड्या एसटीच्या ताब्यामध्ये येणार आहेत.