हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी सोशल मीडियावरही व्यक्त केली जात आहे. आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करून संजय गायकवाड यांच्या वाक्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “देशाला चायनीज व्हायरस ने तर शिवसेनेच्या लोकांना ‘इटालियन व्हायरस’ ने ग्रासले आहे ! सत्तेकरिता लाचार झालेली शिवसेना आता हिंदु धर्मावर टीका करतेय. बरळणारे सर्वच ‘संजय’ शिवसेनेत भरले आहेत. हिंदु धर्म आणि किर्तनकारांविषयी अपशब्द काढणाऱ्या मूर्ख आमदार संजय गायकवाड चा तीव्र निषेध ! ” अशा शब्दात त्यांनी हे ट्विट केला आहे.
देशाला चायनीज व्हायरस ने तर शिवसेनेच्या लोकांना 'इटालियन व्हायरस' ने ग्रासले आहे ! सत्तेकरिता लाचार झालेली शिवसेना आता हिंदु धर्मावर टीका करतेय.
बरळणारे सर्वच 'संजय' शिवसेनेत भरले आहेत.
हिंदु धर्म आणि किर्तनकारांविषयी अपशब्द काढणाऱ्या मूर्ख आमदार संजय गायकवाड चा तीव्र निषेध !— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) May 12, 2021
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोरोना संदर्भात संजय गायकवाड यांची स्थानिक वृत्तपत्रात बातमी छापून आली त्यावरून वारकरी संप्रदायात नाराजी पसरली मांसाहार केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल कोरोनातून तुम्हाला देव वाचवायला येणार नाही असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मात्र अनेक वारकरी संप्रदायातील लोकांनी फोन करून त्यांचा निषेध व्यक्त केला.
काय होते वक्तव्य
कोरोना काळात मंदिर ही बंद आहेत देव पण लॉक करण्यात आले आहे तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यायची आहे त्यामुळे उपास-तापास बंद करा रोज चार अंडे खा आणि एक दिवस चिकन खा आणि प्रोटीन युक्त भरपूर खा असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे.
या मग आमने-सामने बघू
त्यावेळी संजय गायकवाड यांनी कथित ऑडिओ क्लिप मध्ये वारकऱ्यांना गर्भित इशारा दिल्याचे ऐकायला मिळते. या ऑडिओ क्लिप मध्ये संजय गायकवाड यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. संजय गायकवाड म्हणतात की ‘तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे पण मी रोज वीस पंचवीस जणांचा अस्थी जाळू लागलो आहे. तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहिती आहे पण मी जे बोललो ते वास्तव आहेत मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे ते बोललो तुम्ही सगळ्या महाराज आणि वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही आम्ही सगळे एकत्र या मग बघू आमचं लॉकडाऊन ३० मेला उठेल 31 मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमने-सामने बघू काय होतं. असंही संजय गायकवाड बोलत असल्याचं ऐकायला मिळत आहे