कराड जनता बॅंकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Karad Janata Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड जनता सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या कर्जांचीही पोलिस चौकशी सुरू आहे. याचदरम्यान आठ संचालकांनी त्या खटल्यात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे. तब्बल सहा वर्षापूर्वी 296 कर्मचाऱ्यांना 4 कोटी 53 लाखांची कर्जे दिली होती. ती चुकीच्या पद्धतीने दिल्याचा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह न्यायालयातही धाव घेतली होती. त्या कर्जांची चौकशीचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. तपासी अधिकारी म्हणून पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांची नेमणूक आहे.

कराड जनता बँकेचे जे कर्मचारी राजीनामा देवून बाहेर पडले आहेत, त्यांच्यासह नोकरीवरील सुमारे 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्जे तत्कालीन संचालक मंडळाने उचलली आहेत. ती रक्कम सुमारे चार कोटी 52 लाख 87 हजार आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील- वाठारकर, उपाध्यक्षांसह सर्व संचालक व बँकेचे तत्कालीन अधिकारी यांनी 2016 मध्ये कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यात रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बॅंकेला वाचविण्यासाठी कर्मचारी, संचालकांनी कर्जे काढून ठेवी द्याव्यात, ती कर्जे संचालक मंडळ फेडेल, अशा आशयाची विनंती केली. त्यास कर्मचारी तयार झाले. त्यांनी 2016 मध्ये कर्ज प्रकरणे तयार करून दिली. मात्र प्रत्यक्षात ती कर्जे तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लपवून ठेवली. त्यावेळी कर्मचारी विरोध करू लागले. मात्र त्यांना भिती दाखवून ती कर्जे मंजूर केली. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये ती कर्जे अस्तीत्वात आणली गेली. ती तत्कालीन अध्यक्ष वाठारकर यांच्या निकटच्या तीन मित्रांसह कर्जदारांच्या खात्यावर रक्कम वेगवेगळ्या पद्धतीने जमा केली आहे. त्यानंतर ती खाती बंद झाली आहेत, तशी माहिती कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीत दिली आहे. बँकेचे तत्कालीन अध्यक्षांसहीत अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे.

तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, कर्ज विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जांची रक्कम अपहारीत करून मनी लाँड्रींग कायद्याच्या भंग केला आहे. त्यामुळे 296 कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायाधिश एस. ए. विरानी यांनी त्या सगळ्या प्रकरणाची पोलिस चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात सात संचालकांनी अटकपू्र जामीनासाटी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे. त्यात राजीव शहा, दिनकर पाटील, शंकरराव पाटील, वसंतराव सिदे, प्रतीभा पाटील, ज्योती शाह, दिलीप चव्हाण व प्रकास तवटे अशी अटकपूर् फेटाळलेल्यांची कर्मचाऱ्यातर्फे सरकारी वकील आर. डी. परमाज, आर. सी. शाह व सातऱ्याचे अॅड. प्रशांत लोमटे यांनी काम पाहिले.