पाठलाग करून त्रास देणाऱ्या परप्रांतियावर विनयभंगाचा गुन्हा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | येथील एका युवतीला मोबाईलवरून तुझ्याशी लग्न करायचे असे म्हणून, युवतीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या परप्रांतियावर शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अजय विश्वनाथ यादव (रा. एमआयडीसी, सातारा, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2020 ते 12 एप्रिल 2021 या कालावधीत मोबाईलवर कॉल करून मला तुझ्याशी लग्न करायचे असे युवक म्हणत होता, तसेच सातत्याने पाठलाग करून युवतीला त्रास देत होता. 2 एप्रिलला ही युवती मेडिकलमध्ये औषधे घेत होती. यावेळी अजय तेथे आला. त्याने पुन्हा लग्न करायचे आहे, असे सांगितले, तसेच लग्न केले नाहीस तर मी तुझा असाच पाठलाग करत राहीन, असा दम दिला.

त्याला युवतीने प्रतिसाद दिला नाही. त्या वेळी त्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार मेचकर तपास करत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment