Tuesday, June 6, 2023

संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे विधान केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटवर त्यांनी या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इतर देशांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या जास्त आहे. आणि विषाणूचे  संक्रमण रोखण्यासाठीच्या यंत्रणेची आपल्याकडे कमतरता होती. पण या संचारबंदीच्या  काळात ही यंत्रणा तयार झाली आहे. आता आर्थिक हालचाली सुरु करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. आता लोकांचीही मानसिकता झाली आहे त्यामुळे आता हळूहळू आर्थिक क्रिया चालू केल्या पाहिजेत असे ते म्हणाले. या बरोबरच संचारबंदीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे देश वाचला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

निवडणुकीच्या वेळी लग्न, अंत्यविधी अगदी दहाव्यालाही हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी कुठे गेले असा टोलाही त्यांनी मारला आहे. लोकांच्या डोक्यातून कोरोनाची भीती घालविली पाहिजे त्यांना दक्षतेसह बाहेर वावरण्याची  पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आमदार रोहित पवार, निलेश राणे, प्राजक्त तनपुरे यांच्या ट्विटरवर झालेल्या शाब्दिक वादावर विचारले असता त्यांनी “मी इतरांबद्दल सांगू शकत नाही. मात्र मी सभ्य आहे आणि स्वतःची गॅरंटी देऊ शकतो” असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.