औरंगाबाद : दलित महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. एका धारणग्रस्त कुटुंबाला त्याच्या शेतीचा मोबदला गेल्या 5 वर्षांपासून अद्यापही मिळाला मिळाला नाही. त्यांना न्याय मिळावा म्हणून त्या कुटुंबासह अमरण उपोषण सुरू करण्यात आली आहे.
याबद्दल हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना, त्या कुटुंबाचे सदस्य विठ्ठल केंदाळे यांनी सांगितले कि, “कृष्णा खरोऱ्यात आमची साडेचार एक्कर जमीन होती. त्यावर 2016 साली धरण बांधण्यात आले. त्याचा मोबदला आम्हाला अद्यापही मिळालेला नाही. आमचे सर्व कुटुंब आज आर्थिकरित्या दुर्बल झाले आहे. आमचे मुले सुशिक्षित बेरोजगार आहेत. आम्ही आता भूमिहीन असल्यामुळे त्यांना सरकाने नोकरी द्यावी. तसेच आमच्या शेतीचा मोबदला देखील द्यावा. अन्यथा आम्ही त्याच धरणात आत्महत्या करु आसा इशाराही त्यांनी दिला आहे”.
दरम्यान, दलित महासंघाचे सरचिटणीस सुरेश चव्हाण आणि त्या कुटुंबाला अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देतात असेही त्यांनी आरोप केला आहे. ते संपूर्ण कुटुंब अमरण उपोषणाला बसलेले असूनही त्यांची अद्यापही दाखल घेतली गेली नाही असे सुरेश चव्हाण यांनी सांगितले.