आई रागावल्यामुळे सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

दापोली : हॅलो महाराष्ट्र – दापोली ( Dapoli) तालुक्यातील आंबवली गावामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गावातील इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला. त्यामुळे संपूर्ण गावात ( Dapoli) मोठी खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू हा घातपात आहे की आत्महत्या याची चर्चा सध्या गावात रंगू लागली आहे. मात्र, मृत तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियशी राऊत असे मृत तरुणीचे नाव आहे. आज सकाळी गावाशेजारील विहिरीत नियशीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मात्र हि मुलगी विहिरीमध्ये कशी पडली, विहिरीकडे नेमकी कशासाठी गेली होती असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे. तिच्या पायातील दोन्ही चप्पल विहिरीमध्ये तरंगताना आढळून आल्या आहेत. त्यामुळे ती अचानक तोल जाऊन पडली की तिला अन्य कोणीतरी विहिरीत ढकलले हे पोलीस स्पष्ट होईल.

नियशी आपल्या आईसोबत राहते तर वडील कामानिमित्त मुंबई येथे असतात. रविवारी नियशी अचानक गायब झाली. यानंतर तिची सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. तिच्या मृतदेहाचे दापोली उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले असून अहवाल आल्यानंतर तिचा मृत्यू कसा झाला हे समजेल. यादरम्यान खेकडे पकडायला नेण्यावरून तिला ओरडण्याचा राग मनात धरून तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची तक्रार मृत तरुणीची आई नंदिनी राऊत यांनी दिली आहे. मात्र तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं