औरंगाबाद | लॉकडाऊनमुळे मागील चार महिन्यापासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया 11 जून रोजी सुरू करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांमध्ये शाळेत 667 मुलांनी तात्पुरते प्रवेश नोंदवले आहेत. त्यातील कागदपत्रांची पडताळणी करून फक्त 99 प्रवेश निश्चित झालेले आहेत.
पहिली साठी तीन हजार 621 तर प्री-प्रायमरी साठी दोन शाळांमध्ये केवळ 4 जागांची क्षमता आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी 30 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ देण्यात आली. होती या कालावधीत सुमारे 11 हजार 861 अर्ज प्राप्त झाले होते. शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन लकी ड्रॉची प्रक्रिया सात एप्रिल रोजी पार पडली होती.
प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने 2641 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली असून उर्वरीत काहीजण अजून प्रतीक्षेत आहेत. शुक्रवार पर्यंत प्रत्यक्ष 99 आणि तात्पुरते 667 जनाचे प्रवेश झाल्याची माहिती मिळाली आहे लॉटरी द्वारे निवड झालेल्या मुलांना अगोदर प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी मिळणार आहे.