सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू; तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडल्याने अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राजस्थानमधील बीकानेरमध्ये सेल्फीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी तिने तिच्या फ्लॅटच्या तिसऱ्या मजल्यावर चढून सेल्फी घेत होती. त्याच वेळी तिचे संतुलन बिघडल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी नेट असतानाच तिचा मृत्यू झाला. बीकानेरच्या सुजनादेसरच्या गंगा रेसिडेन्सीमध्ये हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे कुसुम तंवर ही तिचा पती कमल तंवर यांच्यासह गंगा रेसिडेन्सी येथे फ्लॅटच्या देखभालीसाठी आली होती. यावेळी ती रेसिडेन्सीच्या तिसर्‍या मजल्यावर पोहोचली आणि छतावर मोबाईलद्वारे सेल्फी घेत होती. त्याच वेळी संतुलन बिघडल्यामुळे ती खाली पडली.यांनतर गंभीररित्या जखमी झालेल्या कुसुमला तिचा नवरा आणि जवळच्या लोकांनी बीकानेर येथील पीबीएम हॉस्पिटलच्या ट्रोमा सेंटरमध्ये तातडीने नेले, तेथे गेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच गंगाशहर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.

कोविद -१९ चा नमुनाही घेण्यात आला असल्याची माहिती सीआय गंगाशहर अरविंद भारद्वाज यांनी दिली. तपासणी अहवालानंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करून ते कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाईल. कमल तंवर यांनी गेल्या वर्षीच हा फ्लॅट खरेदी केल्याचे सांगितले जात आहे आणि शनिवारी तो साफसफाईसाठी पत्नीसमवेत फ्लॅटवर आला होता.

येथे बीकानेर जिल्ह्यातील जसरसर पोलिस स्टेशन परिसरातील बिल्नियासर गाव परिसराच्या उप-आरोग्य केंद्राच्या क्वार्टरमध्ये शुक्रवारी रात्री बीकानेरच्या बिल्नियासर गावात झुंझुनूंच्या एएनएम आणि त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली. जसरसरचे एसएचओ उदयपाल सिंह यांनी सांगितले की, ३५ वर्षीय सुमन बिल्नियासर गावच्या उप-आरोग्य केंद्रात एएनएम म्हणून कार्यरत होती. ती आपल्या ११ वर्षांच्या मुलासह येथे सरकारी क्वार्टरमध्ये राहत होती. तिचा नवरा सुरेश सुमारे दोन महिन्यांपूर्वीच झुंझुनूंहून आला होता.

प्राथमिकरित्या शुक्रवारी रात्री दोघा पती-पत्नीमध्ये वाद आढळून आले आहे. यावेळी रागाने पतीने आपली पत्नी आणि मुलाची बेदम मारहाण करून हत्या केली आणि त्यानंतर आपणही फाशी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृताच्या कुटूंबियांना याबाबतची माहिती दिली आहे. पोलिस सध्या आसपासच्या लोकांची विचारपूस करत आहे आणि त्यांचे कुटूंबिय येण्याची वाट पहात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment