पाण्याचे दुर्भिक्ष : जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी तहानलेल्या नागरिकांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

पाथरी तालूक्यातील गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मुदगल बंधाऱ्यात यावर्षी पुर्ण क्षमतेने पाणी आडवण्यात आले होते. याच पाण्यावर आजुबाजुच्या परीसरातील शेती व नागरीकांची तहान भागत आहे परंतू दिवसें दिवस वाढत्या तापमानाने होणाऱ्या बाष्पीभवना बरोबरच प्रचंड उपशाने पाणी झपाट्याने कमी होत गेल परिणामी मुदगल बंधारा कोरडाठाक पडला असुन केवळ मृतसाठा शिल्लक राहीला आहे. शेत जामिनीच्या सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पाथरी तालूक्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या ढालेगाव आणि मुदगल उच्च पातळी बंधाऱ्यात मागील काही वर्षापासुन पुर्ण क्षमतेने पाणी आडवण्यात येत आहे . यातील ढालेगाव बंधाऱ्यातून शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो शहरातील ३५ हजारावर नागरीकांची तहाण या बंधाऱ्याच्या पाण्यावर भागवली जाते या बंधाऱ्याची साठवन क्षमता १४.८७ दलघमी असुन या वर्षी एकून १६ दरवाजातून पुर्ण क्षमतेने पाणी आडवण्यात येऊन हा बंधारा १०० ट्क्के भरण्यात आला होता. या वर्षी जुलै अखेर १०० टक्के भरलेला पाणीसाठा हा मागील ८ महीन्यातील वापराने जवळपास ९६ टक्याने घटला असून वाढत्या तापमाना बरोबरच प्रचंड उपशाने आहे.उर्वरीत पाणी साठ्यात मात्र आता मोठ्या झपाट्याने घट होत चालल्याने आज या बंधाऱ्याची पाणी पातळी ३९० असून पाणी साठी केवळ ०.४३७ दलघमी म्हणजेच ३.२४ टक्के पाणी साठा शिल्लक राहीला आहे.त्यामुळे भविष्यात पाथरी शहरासह बंधारा कार्यक्षेत्रातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईचा सामना करण्याचे चित्र निर्माण होत आहे.तर या बंधरा कार्यक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या २४२ हेक्टरावरील शेती सिंचनाचा प्रश्न सध्याच गंभीर बनला आहे.

तर मुदगलबंधाऱ्यात मार्च महीण्यात केवळ ३ टक्के पाणी साठा शिल्लक होता येणाऱ्या मे ,जुन व पावसाने लांबन दिल्यास जुलै पर्यंत काय होणार हा प्रश्न आहे . त्यात पैठण येथील जायकवाडीच्या नाथसागरात बंधाऱ्यातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने भविष्यातील उपलब्ध पाण्यातुन मुदगल बंधाऱ्यात कॅनालद्वारे पाणी येईल याची शक्यता कमीच आहे . याही परिस्थितीत पिण्यासाठी जायकवाडीच्या पाण्याची मागणी करावी लागणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

मार्च महीण्या पासुनच उन्हाची निव्रता वाढत चालल्याने व मागील पंधरा दिवसा पासुन तापमानात वाढ झाल्याने बंधाऱ्याच्या पाण्यावरही याचा परिणाम दिसुन येत आहे उष्ण तापमाना बरोबरच होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड उपशाने महीण्याभरापुर्वीच मुदगल बंधाऱ्यातील पाणी झपाट्याने कमी होऊन उन्हाळा प्रारंभीच बंधारा कोरडाठाक पडला या बंधाऱ्याची साठवण क्षमता ११.८७ दलघमी जूलैच्या शेवटी १०० भरलेल्या या बंधाऱ्यात आता केवळ मृत साठा शिल्लक राहीला आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.पिण्याच्या पाण्या बरोबरच बंधारा कार्यक्षेत्रातील १ हजार ७ हेक्टरवर शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मुदगल बंधारा कार्यक्षेत्रातील सोनपेठ, विटा, लिंबा, डाकू विंपरी, कान्सूर, यासह परभणी जिल्यातील काही गावातील जवळपास १ हजार ७ हेक्टर आशा जवळपास शेत जामिनीचा सिंचना प्रश्न बंधारा कोरडा पडल्याने गंभीर झाला आहे.

Leave a Comment