कराड तालुक्यातील 25 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रखडलेल्या सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्या टप्प्याने घेण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने सहकार खात्याला दिलेले आहेत. या आदेशामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात कराड तालुक्यातील 25 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या संस्थांच्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द केला असल्याची माहिती कराड तालुका उपनिबंधक संदिप जाधव यांनी दिली आहे.

सहकार प्राधिकरण यांच्या आदेशाने विविध सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द करून निवडणूक घेण्याचे आदेश दिले. या अनुषंगाने एकूण 6 टप्प्यात निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार असून पहिल्या टप्यात सन 2019 मध्ये पात्र असलेल्या पण कोव्हिड 19 मूळे निवडणुकीस स्थगिती देण्यात आलेली होती.

कराड तालुक्यातील पुढील 25 प्रलंबित सहकारी संस्थाचा निवडणूक बिगुल वाजला आहे.

कालिकादेवी सहकारी पतसंस्था, मंगलमूर्ती नागरी पतसंस्था, श्री महालक्ष्मी पतसंस्था, श्री लक्ष्मीदेवी ग्रामीण पतसंस्था, त्रिमूर्ती ग्रामीण पतसंस्था, स्वा धनाजीराव मोहिते ग्रामीण, वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती, पार्वती अर्बन को ऑफ सोसायटी, श्री गोरक्षनाथ ग्रामीण पतसंस्था, गोदडगिरी ग्रामीण पतसंस्था, शेती उत्पन्न बाजार समिती सेवक पतसंस्था, क्रांती महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, कालवडे- बेलवडे उपसाजलसिंचन संस्था, गजानन को ऑफ हौसिंग सोसायटी, सदगुरू बाळूमामा नाविन्यपूर्ण सेवा संस्था, यशराज धान्य व भाजीपाला प्रतवारी व स्वच्छता सेवा संस्था, शेतकरी ग्रोसरी सप्लायर्स सहकारी संस्था, घटनेश्वर पाणी पुरवठा संस्था, सह्याद्री सहकारी पाणी पुरवठा संस्था, कृष्णाई मजूर सहकारी संस्था, आंबामाता मजूर सहकारी संस्था, श्री गुरुदेव दत्त मजूर संस्था, अजिंक्य सेवा पुरविणारा संस्था व सह्याद्री मजूर सहकारी संस्थांचा समावेश आहे.

या संस्थांचा प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रारूप मतदार यादी 20 सप्टेंबर रोजी हरकती व आक्षेप 20/09/21 ते 27/09/21 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत तर हरकती वर निर्णय 4/10/21 पर्यंत अंतिम मतदार यादी 5/10/21 ला प्रसिद्ध करणेत येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात न्यायालयीन आदेशान्वेय व प्राधिकृत अधिकारी यांची नियुक्ती असलेल्या सहकारी संस्था तर तिसऱ्या टप्प्यात दि 1/1/20 ते 31/3/20 या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या संस्था चौथ्या टप्यात 1/4/20  ते 30/6/20 पात्र संस्था पाचव्या टप्प्यात दि. 1/7/20 ते 30/9/20 व सहाव्या टप्यात दि 1/10/20 ते 31/12/20 या कालावधीमधील पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांचा समावेश असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी 31/8/21 ही अर्हता दिनांक देण्यात आली होती. सहकार प्राधिकरण आदेशान्वेय सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्या टप्प्याने घेणार असल्याची माहिती संदीप जाधव तालुका निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिली.

Leave a Comment