जायकवाडीचे आपात्कालीन दरवाजे तिसऱ्यांदा उघडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – स्थानिक पाणलोट क्षेत्रातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मंगळवारी दुपारनंतर स्थानिक नाथसागरात येणारी आवक वाढत गेल्याने दिवसभरात जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवावा लागला.

काल रात्री धरणाचे आपत्कालीन दरवाज्यांसह सर्व दरवाजे चार फुटांपर्यंत वर उचलून गोदापात्रात 80 हजार 172 क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. धरणात येणारी आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल असे धरण नियंत्रण कक्षातून गणेश कराडकर यांनी सांगितले. यावर्षी आपत्कालीन दरवाजे उघडण्याची ही तिसरी वेळ आहे. पाण्याची आवक घटल्याने जायकवाडीत होणारा विसर्ग मंगळवारी सकाळी नऊ हजार क्‍युसेक पर्यंत कमी करण्यात आला होता. परंतु, दुपारनंतर धरणात येणारी आवक वाढल्याने विसर्ग 37 हजार क्‍युसेक पर्यंत वाढविण्यात आला होता. नंतर 56 हजार करण्यात आला.

मात्र, सायंकाळच्या सुमारास धरणात येणारे आवक 70 हजार 663 क्‍युसेक पेक्षा जास्त झाल्याने धरणातून 75 हजार 456 रात्री दहा वाजे दरम्यान 80 हजार 172 क्‍युसेक करण्यात आला. दरम्यान धरण जलसाठा 99.78% झाला असून जायकवाडी धरणाच्या उर्दू व भागातील धरणांपैकी मुळा धरणातून सध्या बऱ्यापैकी विसर्ग सुरू आहे. इतर धरणातून होणारा विसर्ग मात्र जवळपास बंदच आहे.

Leave a Comment