Wednesday, March 29, 2023

“संपूर्ण राज्य सरकारलाच लकवा भरलाय “, चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका

- Advertisement -

सांगली । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे.

या सरकारने कोणतेच काम पूर्ण केले नाही. मराठा आरक्षणापासून ते धनगर आरक्षणा पर्यंत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना पर्यंत सर्वच प्रश्न रखडले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे, तर बुद्धीला लकवा मारल्याची स्थिती आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केली.

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सांगलीतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला।