Saturday, March 25, 2023

जुळेवाडीचे विद्यमान उपसरपंच डी. एस. सोमदे यांचे निधन

- Advertisement -

कराड | जुळेवाडी (ता. कराड) येथील विद्यमान उपसरपंच दादासाहेब सहदेव उर्फ डी. एस. सोमदे (वय 64) यांचे निधन झाले. ते डी. एस तात्या या नावाने सर्वपरिचित होते. 1994 पासून ते गावचे उपसरपंच होते. त्यामधील पाच वर्षे गावचे सरपंच होते.

दादासाहेब सोमदे हे उच्च शिक्षित होते. मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. राजकारणात असूनही त्यांनी गावच्या विविध विकासकामांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची मदत घेतली. आणि कोट्यवधीची विकासकामे मार्गी लावली.

- Advertisement -

त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक विवाहीत मुलगी, चुलत बंधू, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी गुरुवारी (दि. 21) सकाळी नऊ वाजता होणार आहे