लसींच्या निर्यातीवरून सिरम इन्स्टिटयूट ने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात करोनाने कहर केला आहे. अशा परिस्थितीत कोरोना पासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेणं हे खूप महत्त्वाचे बनले आहे. संपूर्ण देशात सध्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहेत परंतु लसींच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या भेडसावत आहे. अशातच देशातील लसी या निर्यात केल्यामुळे विरोधकांसह अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. लसीच्या निर्याती वरून मोठं राजकारण केले जात आहे मात्र या राजकारणाचा पार्श्वभूमीवर जगातील अग्रगण्य लस उत्पादक संस्था सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण केले आहे.

 

त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत हा एक मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशाचं दोन-तीन महिन्यात लसीकरण करणे शक्य नाही. सोबतच आम्ही भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत. संपूर्ण भारताचा लसीकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्टीकरण सिरम इन्स्टिट्यूट दिला आहे.

याबरोबरच त्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, जानेवारी महिन्यात आपल्याकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा भरपूर साठा उपलब्ध होता. त्या वेळी देशात करोना लसीकरण मोहीमेला वेग नव्हता. शिवाय करोना विषाणूची दुसरी लाट ही आली नव्हती. त्यामुळे भारतीयांनी कोरोना लसीशिवाय कोरोनावर मात केल्याचं सर्वांना वाटलं. यामुळे देशातील कोरोना लसीकरण मोहीम आणखी मंदावली. दरम्यानच्या काळात भारताला लसीची गरज नव्हती त्यामुळे माणुसकीचा धर्म निभावत अन्य देशांना निर्यात केली गेली. पण त्यानंतर मात्र करोना विषाणू ची लाट आली तेव्हा या देशांनी भारताला मदत केली तरच निर्मितीबाबत विचार केला तर आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. शिवाय आम्ही सतत लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी भर देत आहोत. त्यामुळे भारताला गरज असताना आम्ही लस निर्यात केली नाही असं स्पष्टीकरण सिरम इन्स्टिट्यूट कडून देण्यात आले आहे.

Leave a Comment