सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीवर असणारी बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शेतकऱ्यांच्यामधून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.
बैलगाडीवरील शर्यती ठेवण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वारंवार आंदोलन करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी,संघटना शेतकरी संघटना,रयत क्रांती संघटना याच्यासह अनेक राजकीय पक्षाने देखील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती.
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील काही महिन्यांपूर्वी बैलगाडी शर्यतीच्या परवानगीसाठी एक मोठा आंदोलन राज्यभर उभारलं होतं आणि आता या बैलगाडी शर्यतीला अखेर महाराष्ट्रात सशर्त परवानगी मिळाल्याने सर्व शेतकरी वर्गातुन प्रचंड आनंद व्यक्त होत आहे.तर शेतकरयांच्यासाठी सोन्याचा दिवस ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत बैलांच्या सोबत गुलाल उधळून बैलगाडी शर्यत परवानगीचे स्वागत सांगली जिल्ह्यातील शेतकरयांनी केले आहे.