बाप हा बाप असतो! सासरच्या त्रासाला कंटाळलेल्या मुलीला वाजत गाजत आणले घरी; Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बापासाठी आपली लेक ही सर्वकाही असते. तिला थोडी ठेच लागली तरी पहिले पाणी हे बापाच्या डोळ्यातून येते. अशातच जर त्याच मुलीवर अत्याचार होणारे प्रसंग घडले तर बाप संपूर्ण जगाशी लढायची तयारी दाखवतो. त्यावेळी तो समाजाचा किंवा जगाचा विचार न करता फक्त आपल्या फक्त मुलीच्या सुखाचा विचार विचार करतो. याचंच एक उदाहरण रांचीमध्ये घडलं आहे. याठिकाणी एका बापाने सासरच्या जाचाला कंटाळलेल्या लेकीला चक्क बँडबाजा वाजवत आपल्या घरी पुन्हा आणले आहे. सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या सामाजात एखाद्या मुलीचे लग्न झाले की तिला वाजत गाजत सासरी पाठवले जाते. मात्र रांचीमध्ये हाच प्रकार उलटा घडला आहे. रांचीमधील एका वडिलांनी मुलीवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आवाज उठवत आपल्या मुलीला वाजत गाजत पुन्हा घरी आणले आहे. प्रेम गुप्ता असे मुलीच्या वडिलांचे नाव असून त्यांनी समाजाचा विचार न करता, मुलीच्या सुखासाठी पुन्हा तिला घरी परत आणले आहे. इतकेच नव्हे तर, घरी आणताना तिला बँडबाजा वाजवत मिरवणूक काढत आणि फटाके वाजवत परत आणले आहे. यामुळे आज त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

https://www.facebook.com/100009753033863/videos/1733693897042591/?app=fbl

सध्या या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रेम गुप्ता आपल्या मुलीला वाजत गाजत घरी घेऊन जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या मिरवणुकीचा व्हिडिओ स्वतः प्रेम गुप्ता यांनी फेसबुकवर टाकला आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्रेम गुप्ता यांनी म्हटले आहे की, “जर तुम्ही मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात करता, तर मग नंतर तिच्यासोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टीही सहन न करता, तिला थाटामाटात सन्मानानं घरी परत आणा. मुली या खूप मौल्यवान आहेत” आज त्यांनी केलेल्या या कृतीचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रेम गुप्ता यांनी आपल्या मुलीचे लग्न इंजिनियर असलेल्या सचिनशी लावून दिले होती. आपली मुलगी या मुलासोबत खूप सुखी राहील अशी आशा त्यांना होती. मात्र लग्नाचे एक महिने उलटून गेल्यानंतरच सचिनच्या घरच्यांनी प्रेम गुप्ता यांच्या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच यानंतर सचिनचे देखील पूर्वी आणखीन एक लग्न झाले अशी माहिती उघडकीस आली. या सर्व प्रकारानंतर प्रेम गुप्ता यांनी आपल्या मुलीला सासरी न ठेवता पुन्हा माहेरी आणण्याचा निर्णय घेतला. यावेळी माहेरी आणताना त्यांनी आपल्या मुलीला वाजत गाजत घरी आणले.