Sunday, May 28, 2023

जन्मदात्या पित्याने केले मुलीच्या हातावर चाकुने वार

औरंगाबाद – शहर व परिसरात मागील अनेक दिवसांपासून शुल्लक कारणांवरून चाकू किंवा तलवारीने वार करणे, खून करणे अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता बाथरूम मध्ये पाणी सांगण्याच्या कारणावरून दारुड्या पित्याने मुलीला शिवीगाळ करून चाकूने हातावर वार केल्याची घटना शहरातील मिटमिटा भागातील तारांगण कासलीवाल येथे घडली आहे.

विक्रांत हरिश्‍चंद्र निर्मळ असे दारुड्या पित्याचे नाव आहे. दारूच्या नशेत घरी आलेल्या विक्रांतने बाथरूम मध्ये पाणी का सांडले असे म्हणत मुलीला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच चाकूने हाताच्या डाव्या अंगठ्यावर वारही केला. यामध्ये मुलीच्या हाताला दुखापत झाली आहे.

याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात दारूड्या पिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.