भारतीय पासपोर्टचा दरारा वाढला, आता व्हिसाशिवाय 59 देशांचा करू शकता प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय पासपोर्टधारक आता व्हिसाशिवाय 59 देशांमध्ये जाऊ शकतील.हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्ट 7 स्थानांनी 83 व्या स्थानावर पोहोचला आहे. या क्रमवारीत सिंगापूर आणि जपान संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत तर पाकिस्तानची स्थिती सोमालिया आणि येमेनपेक्षा वाईट आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) द्वारे जारी केलेल्या डेटाच्या आधारे हेन्ले पासपोर्ट इंडेक्स जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी बनवतात .

कोणत्याही देशाच्या पासपोर्टची ताकद त्या देशाच्या पासपोर्टने व्हिसाशिवाय किती देशात प्रवास करता येईल यावर अवलंबून असते. आता भारताच्या पासपोर्टवर व्हिसाशिवाय 59 देशांमध्ये प्रवास करता येणार आहे. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीत सिंगापूर आणि जपान संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही देशांच्या पासपोर्टमुळे जगातील एकूण 192 देशांना व्हिसाशिवाय भेट देता येते.

आता व्हिसाशिवाय येथे जा
59 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास म्हणजे फक्त भारतीय पासपोर्टच्या मदतीने तुम्ही त्या देशांमध्ये फिरू शकता, राहू शकता. मात्र तुम्हाला किती दिवस कुठे राहण्याची परवानगी दिली जाईल याची मर्यादा आहे. नेपाळ, भूतान, मालदीव, फिजी, इंडोनेशिया, कतार, पॅलेस्टाईन, मकाऊ, बार्बाडोस, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, डोमिनिका, एल साल्वाडोर, जमैका, उत्तर सायप्रस, सेनेगल, सर्बिया, त्रिनिदर आणि टोबॅगो, ट्युनिशिया ,तुर्क आणि कैकोस बेटे यांचा व्हिसाशिवाय जाऊ शकणाऱ्या देशांत समावेश आहे.

हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2006 पासून दरवर्षी पासपोर्टची क्रमवारी लावत आहे, जे जगातील सर्वात जास्त मोफत पासपोर्ट कोणते देश आहेत हे दर्शविते. मात्र, गेल्या 16 वर्षांच्या दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे पासपोर्ट रँकिंग आणखी महत्त्वाचे बनले आहे. कोविड महामारीमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांचा पासपोर्टच्या क्रमवारीत समावेश करण्यात आलेला नाही.

पाकिस्तानातील परिस्थिती येमेन आणि सोमालियापेक्षा खराब
हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये उत्तर कोरिया 104 व्या क्रमांकावर आहे, जिथे पासपोर्ट धारक केवळ 39 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतात. भारताचा शेजारी देश नेपाळ 105 व्या क्रमांकावर आहे. सोमालिया 106 व्या तर येमेन 107 व्या क्रमांकावर आहे. येमेन आणि सोमालियापेक्षाही पाकिस्तानची परिस्थिती खराब आहे. पाकिस्तानी पासपोर्टचा क्रमांक 108 आहे आणि फक्त 31 देशच पाकिस्तानी पासपोर्टने व्हिसा फ्री प्रवास करू शकतात

Leave a Comment