महाराष्ट्रातील पहिल्या “संविधान बचाव” पदयात्रेला उद्या नाना पटोले येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा काँग्रेस ओ बी सी विभाग, अल्पसंख्यांक विभाग आणि अनुसूचित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी येडेमछिंद्र (ता.वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कराड शहरातील पुतळ्यापर्यंत “संविधान बचाव” पदयात्रा आयोजित केली आहे.

या पदयात्रेचे स्वागत कराड शहरात राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आ. नाना पटोले व आ. वाजहत मिर्झा यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संध्याकाळी ४ वाजता होणार आहे तसेच संध्यकाळी ५ वाजता शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जाहीर सभा होणार आहे. तरी या पदयात्रेस जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

येडेमछिंद्र ते कराड शहर अशी २५ किलोमीटर संविधान बचाव यात्रा असणार आहे. देशभरात संविधान पायदळी तुडवून हुकूमशाही कारभार होत आहे या घटनांच्या विरोधात निषेध व्यक्त करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान देऊन जी व्यवस्था उभारली त्या संविधानाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे म्हणूनच “संविधान बचाव” रॅलीचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे त्याची सुरुवात कराडमधून होत आहे म्हणूनच या मुख्य कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष आ. नाना पटोले व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व आ. वाजहत मिर्झा हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत यामुळे काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे व संविधान वाचावे अशा सर्वानी, कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे. हि पदयात्रा येडे मछिंद्रगड येथून सकाळी ७ वाजता निघणार आहे व या यात्रेचे स्वागत कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ संध्यकाळी ४ वाजता होणार आहे तशीच हि यात्रा कराड शहरातून जाऊन शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या यात्रेची सांगता होणार असून तिथे संध्यकाळी ५ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे. अशी माहिती काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी दिली आहे.