हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्यावेळी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. नवीन वर्षातील पहिल्या सण म्हणून मकर संक्रातीची ओळख आहे. यंदा 2024 मध्ये मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यादिवशी तिळाचे लाडू बनवले जातात. लहान मुले पतंग उडवतात. तसेच, या दिवशी संक्रांती देवीची पूजा केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या सणाचे महत्त्व.
मकर संक्रांत मुहूर्त
14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 02:42 वाजता सूर्य ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 15 जानेवारी रोजी उदया तिथी येईल. याच दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाईल. नव्या वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे त्याला विशेष स्थान देण्यात येईल.
वातावरण बदल
खरे तर मकर संक्रांतीनंतर नद्यांमध्ये बाष्पीभवनाची सुरू होत असते. ज्यामुळे शरीरातील अनेक रोग दूर होतात. या ऋतूमध्ये तीळ खाणे आणि गुळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामुळे शरीरात उब टिकून राहते. असे म्हणतात की, मकर संक्रांत झाल्यानंतर थंडीचे प्रमाण कमी होत जाते.
खेंगाट भाकरी
संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी दिवशी महाराष्ट्रातील परंपरेनुसार, खेंगाट भाकरी बनवली जाते. भाकरी म्हणजे बाजरीची तीळ लावून बनवली जाते. तसेच, खेंगाट म्हणजे सर्व भाज्या एकत्र शिजवल्या जातात. या सर्व भाज्या खाणे शरीरासाठी पौष्टिक मानले जाते.