रामायणातील रावणाच्या भुमिकेसाठी अमरिश पुरींना आली होती पहिली ऑफर, पण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेची मागणी लक्षात घेता रामायण दूरदर्शनवर प्रसारित केले गेले.रामच्या भूमिकेत अरुण गोविल, सीताच्या भूमिकेत दीपिका चिखलिया, लक्ष्मणच्या भूमिकेत सुनील लाहिरी तर रावणच्या भूमिकेत अरविंद त्रिवेदी यांच्या अभिनयाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.रामायण प्रसारित होईपर्यंत या सर्व अभिनेते-अभिनेत्रींनीही सोशल मीडियावर वर्चस्व राखले होते.

मात्र, आता रामायण मालिकेविषयी रोज एक नवीन बाब समोर येत आहे. अरविंद त्रिवेदी हे रावणाच्या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हते, अशी माहिती मिळाली आहे. यासाठी अमरीश पुरी यांना पसंती दिली जात होती. रामानंद सागरच्या ‘रामायण’ या मालिकेत अमरीश पुरी रावणाची भूमिका साकारणार होते.अरविंद त्रिवेदी यांनीही हे स्पष्ट केले आहे की अमरीश पुरी यांनीही रावणाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते आणि अरुण गोविल यांच्यासह इतर कलाकारांनीही त्यांना पसंत केले होते.

Amrish Puri Death Anniversary: 5 Villainous Roles By The Veteran ...lo

रामानंद सागर ‘रामायण’ साठी ऑडिशन घेत असल्याचे जेव्हा अरविंद त्रिवेदी यांना समजले की ते गुजरातहून मुंबईला आले होते.त्यांना केवटची व्यक्तिरेखा मिळण्याची अपेक्षा होती. यानंतर सागरयांनी त्यांना स्क्रिप्ट वाचण्यास सांगितले. अरविंद त्रिवेदी यांनी पटकथा वाचली तेव्हा रामानंद सागर म्हणाले की, त्यांना अरविंद यांच्यामध्ये ‘लंकेश’ ही व्यक्तिरेखा मिळाली आहे.

अरविंद त्रिवेदी यांनी सांगितले की आपल्याला रावण हि व्यक्तिरेखा साकारण्यास मिळाली कारण आपल्याला स्वत: त्या व्यक्तिरेखे मध्ये घुसून ती भूमिका रंगवण्याचे कसब माहिती होते. यानंतर अरविंद त्रिवेदी यांना अमरीश पुरी यांच्याऐवजी रावणाच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले.

Amrish Puri was rejected before this "Ravana" of Ramayana, know ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment