हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा-रहिमतपूर मार्गावरील महत्वाचा असलेल्या व गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षे असलेला रहिमतपूर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला. हा पूल खुला केल्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या चार वर्षांपूर्वी रहिमतपूर रेल्वे गेटवर या पुलासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, दोन वर्षांहून अधिक काळ पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. गेट बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी नेहमीची होती.
आता चार वर्षानंतर या पुलाचे काम पूर्ण झाले असून पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रहिमतपूरमार्गे खटाव, खानापूर, सांगली, पलूस यांसह कर्नाटक राज्यात जाणाऱ्या वाहनांना आता रेल्वे गेटवरील उड्डाणपुलामुळे अडकून पडावे लागणार नाही. रेल्वे प्रशासनाच्या वतीने या पुलाचे नुकतेच औपचारिक उद्घाटन करण्यात आले. आता पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.