ड्रगचा खेळ गुजरात मधून तरी सुरू नाही ना?? नवाब मलिकांनी उपस्थित केली शंका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील द्वारकाच्या सलयामधून पोलिसांनी 350 कोटींच्या ड्रग्जसह हेरॉईन जप्त केले आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असून याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ड्रगचा खेळ गुजरात मधून तरी सुरू नाही ना अशी शंका नवाब मलिक यांनी उपस्थित केली आहे.

सागरमार्गे गुजरातच्या माध्यमातूनन ड्रग्ज पसरवण्याचे काम सुरु आहे. हे कोणाच्या माध्यमातून केले जात आहे याचा तापस करावा. ड्रगचा खेळ करणारे गुजरात मध्ये अड्डा बनवून बसले आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी एनआयए आणि एनसीबी ने करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. एनसीबीचे प्रचारतंत्र सर्वांचे लक्ष फिल्म अभिनेत्यांकडे वळवण्याचे आहे. पण गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले. त्याची चौकशी व्हावी असे मलिक यांनी म्हंटल.

गुजरात मध्ये 350 कोटींचे ड्रग-

गुजरात मधील द्वारकाच्या सलयामधून पोलिसांनी 350 कोटींच्या ड्रग्जसह हेरॉईन जप्त केले आहे. पोलिसांनी प्रथम ड्रग्जची 19 छोटी पाकिटे जप्त केली. यानंतर आरोपीच्या घरातून 47 मोठी पाकिटे जप्त करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 50 किलो मेफेड्रोन आणि 16 किलो हेरॉईन पकडण्यात आले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 350 कोटी रुपये आहे. पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान गुजरातची सागरीकिनार तस्करीचा नवा मार्ग बनला आहे का अशी शंका निर्माण झाली आहे.

Leave a Comment