मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्ध महिलेची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी पळवली

0
33
gold chain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ५५ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी हेल्मेट धारी दुचाकीस्वरांनी हिसकावली. ही घटना शनिवारी सिडको एन-३ परिसरात केटली गार्डनजवळ सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.कमल जाधव (रा.प्लॉट क्र.३९५,सिडको, एन-३) असे वृद्ध महिलेचे नाव आहे.

शनिवारी सकाळी कमल जाधव ह्या त्यांच्या नेहेमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी जात होत्या, केटली गार्डनच्या जवळ जावुन सकाळी साडे सहा ते पांवणेसातच्या सुमारास अभय राठोड यांच्या घराजवळ आलेल्या दोन दुचाकीस्वार चोरट्यानी जाधव यांच्या गळ्यातली दीड तोळ्याची साखळी हिसकावली.

ही घटना घडल्यानंतर कमल जाधव यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत जावून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनतर पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यासंबंधी सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे या घटनेची तपासणी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here