औरंगाबाद | उद्यापासून औरंगाबाद शहरात अजून नऊ स्मार्ट बस धावणार आहेत. स्मार्ट सिटी बस कमी असल्यामुळे बराच वेळ सिटी बसची वाट बघावी लागते. आणि कामावर जाणाऱ्या कामगारांची देखील फजिती होते. त्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
हर्सूल टी पॉइंट, दिल्लीगेट, मध्यवर्ती बसस्टॅन्ड मार्गी या बस धावणार आहेत.सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पहिली बस आणि रात्री साडेनऊ वाजता शेवटची बस राहणार आहे. सिडको ते रांजणगाव ही दुसरी बस आणि बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा, टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती बस स्टॅन्ड अशी असेल आणि तिसरी बस जयस्वाल हॉल, टीव्ही सेंटर, गोदावरी पब्लिक स्कूल, हिमायत बाग, दिल्ली गेट, मध्यवर्ती बस स्टँड मार्गे धावणार आहे.
आता स्मार्ट सिटी बसची संख्या 41 झाली आहे. यामुळे प्रवाशांना कुठलीही काळजी करायची गरज नाही. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी 7507953825 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.