नवी दिल्ली । LIC IPO मुळे, आता IDBI बँकेची निर्गुंतवणूक योजना जोर धरत आहे. IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. CNBC-TV18 च्या रिपोर्ट्स नुसार, सरकार या वर्षी एप्रिलपर्यंत IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्यासाठी अर्ज आमंत्रित करू शकते. रिझर्व्ह बँकेने IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्याच्या प्रक्रियेची यापूर्वीच चौकशी केली आहे. आता IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्याचे काम येत्या 9 महिन्यांत पूर्ण होऊ शकते.
रिपोर्ट नुसार, देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेली LIC, IDBI बँकेतील आपला संपूर्ण हिस्सा सरकार विकणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कोणत्याही बँकेतील प्रमोटरची हिस्सेदारी 26% पेक्षा जास्त असू शकत नाही.
चांगल्या कोटची आशा आहे
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने CNBC TV18 ला सांगितले की, “खासगी बँकेत प्रमोटर होल्डिंग केल्यामुळे IDBI बँकेतील स्टेक विकण्याचा कोणताही दबाव नाही. आम्हाला खात्री आहे की, आम्हाला IDBI बँकेला चांगला प्रतिसाद मिळेल.”
LIC चा 49.24% हिस्सा
सध्या, सरकारकडे IDBI बँकेत 45.58% आणि LIC ची 49.24% हिस्सेदारी आहे. LIC ही बँकेची प्रमोटर आहे आणि व्यवस्थापकीय नियंत्रण तिच्याकडे आहे. 21 जानेवारी 2019 पासून, IDBI बँक इन्शुरन्स कंपनी LIC ची सब्सिडियरी बनली. त्यानंतर LIC ने बँकेचे 827,590,885 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. या अधिग्रहणानंतर, LIC ची बँकेतील भागीदारी 51% पर्यंत वाढली.
मार्चमध्ये LIC चा IPO
मात्र, डिसेंबर 2020 मध्ये, IDBI बँकेने क्वालीफाइड इंस्टीट्यूशनल प्लेसमेंटद्वारे अतिरिक्त इक्विटी शेअर्स जारी केले, ज्यामुळे बँकेतील LIC चा हिस्सा 49.24% पर्यंत कमी झाला. यानंतर LIC चे असोसिएट कंपनी म्हणून रीक्लासीफाइड करण्यात आले.
LIC ची या वर्षी मार्चमध्ये लिस्टिंग होणार आहे. आपल्या अर्जात, कंपनीने असे लिहिले आहे की असोसिएट कंपनीत केलेल्या गुंतवणुकीचा कंपनीच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. IDBI बँकेचे शेअर्स सकाळी 11.30 वाजता 0.95% खाली 46.85 रुपयांवर ट्रेड करत होते. तर सेन्सेक्स 21 अंकांनी घसरून 57,811 वर ट्रेड करत आहे.