मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून वेळकाढूपणा केला जातोय ; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी व भाजप कडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आरक्षणप्रश्नी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. काल विनायक मेटे यांनी टीका केल्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणाबाबत या सरकारकडून आपली जबाबदारी झटकण्याचा काम केले जात आहे. वास्तविक या सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. हे सरकार केवळ वेळ घालवत आहे,” अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागा व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग येथे गेले आहेत. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चक्रीवादळाच्या नुकसान भरपाई प्रश्नावरून तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून टीका केली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले,” हे महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवता येत नसल्यामुळे त्यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.

आम्ही पंतप्रधान मोदींकडे हा परष मांडला असून आता त्यांच्याकडून निर्णयाची अपेक्षा आहे. एवढंच हे बोल्त आहे. माझे एवढेच म्हणणे आहे कि, या सरकारने अगोदर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तसा प्रस्ताव तरी तयार करावा. मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी त्या अनुषंगाने तसे मागासलेपणा संदर्भातील नवीन पुरावे तयार करावे लागतील. मात्र, ते पुरावे एकत्र करण्याऐवजी नुसतेच सांगण्याचे काम हे सरकार करीत आहे. हे म्हणजे केवळ मराठा समाजाला फसवत राहण्यासारखे आहे. मराठा समाजाच्याप्रती आमची जी भूमिका आहे ती आम्ही पहिल्या दिवसांपासून आमची भूमिका मांडत आलो आहे. या समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. मात्र हे सरकार तसे करू पाहत आहे,” असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

Leave a Comment