ईद-ए-मिलादसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सण, उत्सव साजरे केले जात आहेत. नुकताच दसरा सण उत्साहात पार पडल्यानंतर आता ईद-ए-मिलादसाठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये राज्याच्या गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत 5 ट्रकला परवानगी देण्यात आली आहे. 25 लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दि. 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी ईद ए मिलाद साजरी केली जाणार आहे. या दिवशी मिरवणूक काढण्यासाठी पाच ट्रकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात असलेल्या लोकांव्यातिरिक्त अतिरिक्त 5 लोकांना पोलिसांची परवानगी घेऊनच सहभागी करून घेता येणार आहे.

जारी केलेल्या या नियमावलीबाबत रजा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी यांनी म्हंटले आहे की, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत 5 ट्रकला परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये फक्त 5 लोक चढू शकतात. अशा प्रकारे 25 लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने 10 ट्रक आणि 150 लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती.

ईद ए मिलादसाठी राज्य सरकारची अशी आहे नियमावली –

1) मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी आवश्यक

2) सामाजिक अंतर राखणे बंधन कारक आहे.

3)सॅनीटाईझर आणि मास्क वापरणे बंधनकारक.

4) एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक सहभागी होऊ शकतात, प्रत्येक ट्रकवर जास्तीत जास्त 5 लोकांना परवानगी.

5)मिरवणुकाच्या स्वागतासाठी पोलिसांच्या परवानगीने पंडाल उभारले जाऊ शकतात.

6) लोकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करू नये.

7) पूर्व परवानगीने लाऊडस्पीकर लावता येणार, मात्र ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करावे लागणार.

8) मिरवणुकीच्या स्वागतासाठी मंडप उभारायचे असल्यास नियमांचे पालन करावे लागणार

Leave a Comment