16 मार्चला सरकार घेणार DA बाबतचा निर्णय, जाणून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I केंद्र सरकार लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना होळीची भेट देऊ शकते. या आठवड्यात पगारातील महागाई भत्ता (DA) वाढवण्यासोबतच 18 महिन्यांपासून रखडलेला जुना DA ही निकाली काढता येईल. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, 16 मार्च रोजी सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते.

यावेळी DA मध्ये 3 टक्के वाढ करण्यात येणार असून, ती 31 टक्क्यांवरून 34 टक्के होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीनुसार त्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. याशिवाय सरकार 16 मार्चलाच थांबलेल्या DA बाबतही निर्णय घेऊ शकते. 18 महिन्यांच्या DA चे वन टाईम सेटलमेंट करण्याची सरकारची तयारी असल्याचे बोलले जात आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची थकबाकी देण्याचा निर्णय सरकारने आता स्थगित केला आहे.

निवडणुकांमुळे झाला उशीर
यूपीसह पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे महागाई भत्ता आणि रखडलेला DA वाढवण्याबाबत निर्णय घेण्यास उशीर होत आहे. 18 महिन्यांपासून प्रलंबित असलेला DA देण्याची मागणी कर्मचारी करत होते. याबाबतचा निर्णय 16 मार्च रोजी येणार असून त्याआधी कॅबिनेट सचिवांशी चर्चा होणार आहे. सरकारने महागाई भत्ता वाढवला तर सुमारे 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

आता DA 31 टक्के दराने मिळतो
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 31% DA मिळतो. या 3 टक्क्यांच्या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्तीत जास्त 20,000 रुपये आणि कमीत कमी 6,480 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. AICPI (All India Consumer Price Index for Industrial Workers) च्या आकडेवारीनुसार, DA डिसेंबर 2021 पर्यंत 34.04% वर पोहोचला आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 18,000 रुपये प्रति महिना असेल तर नवीन DA (34%) दरमहा 6,120 रुपये मिळेल. सध्या 31% DA वर 5,580 रुपये मिळतात.

DA कधी सुरू झाला ?
कर्मचाऱ्यांचे राहणीमान आणि अन्न सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये DA बदलला जातो. भारतात पहिल्यांदा 1972 मध्ये मुंबईत महागाई भत्ता सुरू करण्यात आला. यानंतर केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी जुलै आणि ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये दोनदा वाढ करण्यात आली होती.

Leave a Comment