जुलै मध्ये लॉन्च होणार सरकारची हि नवी स्कीम; लाखो रुपये कमावण्याची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत ईटीएफ बाँड जुलैमध्ये पुन्हा आपले दार उघडणार आहे. म्युच्युअल फंडासहित बऱ्याच गुंतवणूकदारांना ईटीएफ बद्दल फारसे समजत नाही. ईटीएफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड हे शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हे सहसा एका विशिष्ट इंडेक्सचा ट्रॅक ठेवतात.  ईटीएफ हे म्युच्युअल फंडासारखेच असतात. मात्र, या दोघांमधील मुख्य फरक हा आहे की, ईटीएफ हे केवळ स्टॉक एक्सचेंजमधूनच खरेदी किंवा विकले जाऊ शकतात. ज्याप्रकारे आपण शेअर्स खरेदी करतो. त्याच प्रकारे आपण एक्सचेंजच्या ट्रेडिंगच्या तासांमध्ये ईटीएफ देखील खरेदी करू शकता. हेच कारण आहे की, आम्ही त्यांच्याबद्दल काही बेसिक गोष्टी सांगणार आहोत.

Bharat Bond ETF anchor investor quota subscribed 1.7 times

एडलवाइज अ‍ॅसेट मॅनेजमेंटने जुलैमध्ये भारत बॉन्ड ईटीएफचा दुसरा हप्ता सुरू करण्याची घोषणा केली आहे. याच्या दुसर्‍या हप्त्यात नवीन भारत बाँड ईटीएफच्या दोन सीरीज असतील. याची मॅच्युरिटी अनुक्रमे एप्रिल २०२५ आणि एप्रिल २०३१ असेल. ज्या गुंतवणूकदारांकडे डिमॅट खाते नाही तेदेखील या समान मॅच्युरिटीवाल्या ‘भारत बॉन्ड फंड्स ऑफ फंड्स ‘ (एफओएफ) मध्ये गुंतवणूक करू शकतील.

भारत बॉन्ड ईटीएफ प्रोग्रामही भारत सरकारची एक स्कीम आहे जी, डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंटने सुरू केली आहे आणि नंतर एडेलविस अ‍ॅसेट मॅनेजमेंटला या उत्पादनाच्या डिझाईन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली. ईटीएफच्या दोन नवीन सीरिजच्या लॉन्च नंतर, एडलवाइज म्युच्युअल फंडाने बाजारातून १४,००० कोटी रुपये उभे करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

एडलवाइज अ‍ॅसेट मॅनेजमेंटने सांगितले की,’ या इश्यू द्वारे बाजारपेठेच्या मागणीवर आधारित ११,००० कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य आहे. याद्वारे जमा होणारी रक्कम केवळ ३,००० कोटी रुपये इतकी असेल. परंतु यावेळी गुंतवणूकदारांकडून जास्त प्रतिसाद मिळाल्यास ती वाढवून १४,००० कोटी रुपये इतकी केले जाऊ शकते.

कर कसा आकारला जाणार ?
या बाँड ईटीएफवर डेट म्युच्युअल फंडाप्रमाणेच कर आकारला जातो. म्हणजेच जर गुंतवणूक तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवली तर इंडेक्सेशन बेनिफिटसह २० टक्के कर भरावा लागेल. जो की तीन वर्षांच्या पर्यायात तुम्हाला जवळपास ६.३ टक्के रिटर्न मिळेल. त्याचबरोबर १० वर्षांच्या पर्यायात ७ टक्के व्याज दिले जाईल.

किती नफा होईल ?
समजा जर तुम्ही भारत बाँड ईटीएफमध्ये एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यावर ७.५८ टक्क्याने रिटर्न मिळेल, तर १० वर्षांत तुमचे पैसे वाढून २.०७ लाख रुपये होतील. यावर कर म्हणून ७,८३६ रुपये भरावे लागतील. यामध्ये, आपल्याला १.९९ लाख रुपये मिळतील.

किमान गुंतवणूकीची आवश्यकता किती आहे ?
किमान गुंतवणूकदार भारत बॉन्ड ईटीएफमध्ये एक हजार रुपयांची गुंतवणूक करु शकतात. यानंतर आपण १,००० रुपयांच्या मल्टीपलवर गुंतवणूक करू शकता.

तेथे एक्झिट लोड असेल का ?
अ‍ॅलॉटमेंट झाल्यापासून ३० दिवस पूर्ण झाल्यावर किंवा त्याआधीच्या गुंतवणूकीवर ०.१० % एक्झिट लोड लागू असेल. मात्र ,३० दिवस पूर्ण झाल्यानंतर रिडेम्प्शन किंवा स्विच करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी त्यात विशेष काय आहे ?
हे ईटीएफ व्यवस्थापित करण्यासाठी एडलवाइज एएमसी जबाबदार आहे. या फंडासाठी ‘फंड ऑफ फंड’ (एफओएफ) देखील लॉन्च केले आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना सामान्य म्युच्युअल फंडाप्रमाणे गुंतवणूक करण्याची मुभा मिळेल. छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही एफओएफ सोयीच्या आणि लिक्विडिटीच्या बाबतीत अधिक चांगली आहे.

याची तुलना अन्य उत्पादनांशी केली जाऊ शकते ?
भारत बाँड ईटीएफचा कालावधी २०२३ आणि २०३० इतका आहे. या संदर्भात, याची तुलना निश्चित फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन आणि बँकिंग आणि पीएसयू फंडांशी करता येईल. डेट म्युच्युअल फंडांच्या तुलनेत बाँड ईटीएफची कॉस्ट खूपच कमी असते.

या कंपन्यांचा सहभाग असेल
बाँड ईटीएफ निफ्टी इंडिया बाँड इंडेक्समध्ये गुंतवणूक करते. यात एएए रेट केलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे ज्यामध्ये एक्झिम बँक, एचपीसीएल, हडको, आयआरएफसी, नाबार्ड, एनएचएआय, एनएचपीसी, एनटीपीसी, पीएफसी, एनपीसीआयएल, पॉवर ग्रिड, आरईसी आणि सिडबी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत बाँड ईटीएफच्या पहिल्या टप्प्यात १२,४०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ही यशस्वीरित्या जमा करण्यात आली.

इंडिया बाँड ईटीएफ कार्यक्रमात गुंतवणूकदारांचा सहभाग आणि एक्सचेंजमध्ये चांगली लिक्विडिटी दिसून येते. फंड हाऊसने सांगितले की,’ बिड-डेस्क स्प्रेड (खरेदी-विक्री किंमतीतील फरक) ५ ते १० बीपीएसच्या रेंजमध्ये राहिला आहे. या ईटीएफमधील डेली अ‍ॅवरेज ट्रेडिंग व्हॅल्यू ही ३ ते ३.५ कोटी रुपयांपर्यंत झाली आहे, ज्यामुळे हे भारतातील लिक्विड ईटीएफपैकी एक बनले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment