इम्पिरीकल डेटा मिळवून देण्यासाठी राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राने उत्तर दिलं आहे. राज्य शासनास इतर मागास प्रवर्गाची काळजी आहे असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पिरीकल डेटा गोळा करणे हे केंद्र सरकारचे काम असल्याचं नमूद करत आरक्षणाच्या प्रश्नावरुन मोदी सरकारकडे बोट दाखवल आहे. तसेच यासाठी राज्यपालांनी सुद्धा पाठपुरावा करावा अस उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हंटल आहे.

आम्ही पंतप्रधानांची भेट घेऊन ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यसााठी घटनात्मक मार्ग काढण्याची विनंती केली आहे. आपणही पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा आणि समाजाला न्याया मिळवून द्यावा. आपणही आपल्या स्तरावर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन इतर मागास प्रवर्गाच्या २०११ मधील जनगणनेमधील इम्पिरीकल डेटा मिळवून द्यावा, जेणेकरुन पुढील आवश्यक पाऊले उचलणे राज्य शासनास शक्य होईल अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना केली.

दरम्यान, कोरोनामुळे विधानसभेचं अधिवेशन जास्त काळ घेता आलं नाही. मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून इच्छितो की, राज्यामध्ये सध्या असलेली करोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचीही तीव्र शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी केवळ आपल्या राज्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशाबाबत व्यक्त केलेली आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पाहून, सर्व खबरदारी घेऊन अध्यक्ष निवडणूक पार पाडू असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं

Leave a Comment