विद्यार्थिनींच्या कपड्यांवरुन मुख्याध्यापकाचं घृणास्पद वक्तव्य; FIR दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील मचलपूरच्या शासकीय उच्च माध्यमिक शाळेत काही मुलींनी त्यांच्याच शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी काही मुली रंगीत कपड्यांमध्ये शाळेत आल्या होत्या. ज्यामुळे मुख्याध्यापक राधेश्याम मालवीय प्रचंड संतापले. यावेळी मुख्याध्यापक असं काही म्हणाले जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

या मुली सिव्हील ड्रेसमध्ये शाळेत आल्यामुळे प्राचार्य म्हणाले की, उद्यापासून कपड्यांशिवाय शाळेत या, मुलांना तुम्ही बिघडवत आहात. असं म्हटल्यामुळे विद्यार्थिनीना मोठा धक्का बसला. यानंतर या मुलींनी शिक्षकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुख्याध्यापकांच्या या विधानामुळे विद्यार्थिनी संतप्त झाल्या. या गोष्टीचा निषेध म्हणून या मुलींनी शाळेतील इतर विद्यार्थ्यांना एकत्र केले.

यानंतर सर्वांनी शाळेपासून पोलीस स्टेशनपर्यंत रॅली काढून मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. आरोपी मुख्याध्यापक राधेश्याम मालवीय यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मुख्याध्यापक फरार असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती स्टेशन प्रभारी जितेंद्र अजनारे यांनी दिली आहे.

Leave a Comment