सार्वजनिक अन् घरगुती गणेशोत्सवासाठी मुर्तीची उंची ठरली, सरकारकडून नियमावली जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा लाडका सण आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अत्यंत महत्व आहे. यंदा जगभर सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. यावर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करता येणार नाही आहे. सरकारने गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक अलगावचे नियम पाळण्याची अट घातली आहे. सोबत गणेशमूर्तीच्या संदर्भात काही निर्देशही घालून दिले आहेत. ज्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची जास्तीत जास्त उंची ही चार फूट तर घरगुती गणपतीची जास्तीच जास्त उंची दोन फूट असावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश यांचे पालन करावे. सार्वजनिक गणेशत्सोवातील गणपतीची मूर्ती जास्तीत जास्त चार फूट उंचीची असावी. घरगुती गणपतीच्या मूर्तीची उंची जास्तीत जास्त दोन फूट असावी. यावर्षी पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर यांच्या मूर्तीचं पूजन करावे. मूर्ती शाडू किंवा पर्यावरणपूरक असेल तर शक्यतो घराच्या घरीच मूर्तीचं विसर्जन करावे. जर गणेशमूर्तीचं विसर्जन पुढील वर्षी शक्य असेल तर पुढील वर्षी करावे असे या निर्देशात सांगण्यात आले आहे.

 

यासोबत उत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिली गेल्यास त्याचा स्वीकार करावा, जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही हे पहावे. आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावं. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम अर्थात रक्तदान शिबिरं, यास प्राधान्य द्यावं. कोरोना, मलेरिया, डेंग्यू या आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय योजावेत आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करावी असे सगळे निर्देश ठाकरे सरकारने दिले आहेत. यानुसारच गणेशोत्सव साजरा करावा असं स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या गृहखात्याने हे निर्देश लागू केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment