हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना महामारीने कहर केला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत दिवसागणिक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतेय. याचा परिणाम थेट आरोग्य यंत्रणेवर होताना दिसत आहे. परिणामी ऑक्सिजन, बेडस्, औषधांचा तुडवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतो आहे. यामुळे वेळीच रुग्णांना उपचार मिळत नसल्यामुळे अनेकांचा जीवही गेला आहे. कोरोनाबाधित रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठीदेखील पुरेशा व्यवस्था नाहीत. यात सर्वसामान्य माणसांप्रमाणे सेलिब्रेटींनादेखील त्यांच्या जवळच्या व्यक्तींना योग्य आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळॆ गमवावे लागले आहे. आपल्याकडच्या आरोग्य यंत्रणाच माझ्यावडीलांच्या मृत्यूला जबाबदार आहेत असा आरोप अभिनेत्री संभावना सेठने रुग्णालय व आरोग्य यंत्रणेवर केला आहे. यासंदर्भात तिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
https://www.instagram.com/tv/CPKvFeHneUm/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान त्यांची प्रकृती खालावत होती. तेव्हा आयसीयुमध्ये एडमिट करण्यासाठी रुग्णालयांत अगदी साधे बेडही उपलब्ध नव्हते. शेवटी सोशल मीडियावर तिने मदत मागितली. मात्र अखेर ९ मे २०२१ रोजी तिच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर आता रुग्णालयाच्या निष्काळजी व्यवहारामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप संभावनाने केला आहे. वडिलांच्या उपचारादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संभावनाने रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी कश्या पद्धतीचा खेळ सुरु आहे हे तिने सर्वांसमोर आणले आहे.
https://www.instagram.com/p/CPAd1vWHrhD/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओत वडिलांच्या उपचारादरम्यान संभावना रुग्णालयातील कर्मचा-यांना जाब विचारताना दिसत आहे. यावर कोणीही तिला समाधानकारक उत्तर देताना दिसत नाही आहे. डॉक्टर आणि नर्स कोणीही तिच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आहेत. संभावनाने रुग्णालयात अगदी गोंधळ घातला आहे. कशारितीने तिच्या वडिलांवर उपचार केले जात आहे. हे या व्हिडीओच्या माध्यमातून तिने सगळ्यांसमोर आणले आहे. संभावनाने रुग्णालयात कशाप्रकारे उपचार केले जातात..? असा प्रश्न उपस्थित करत रुग्णालयाचा निष्काळजीपण समोर आणला आहे.
https://www.instagram.com/p/CO9jyHrHvvm/?utm_source=ig_web_copy_link
जयपूर गोल्डन रुग्णालयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही तिने सांगितले आहे. या व्हिडीओत तिने तिच्या वडिलांचा मृत्यू हा मेडिकल मर्डर असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याच्या दोन तासानंतरच तिच्या वडिलाचे निधन झाले होते. पितृशोकातून सावरत तिने अखेर हा व्हिडीओ पोस्ट करीत रुग्णालयातील गलथान कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. उपचाराच्या नावावर आपल्या वडिलांची हत्या केल्याचा गंभीर आरोप संभावनाने केला आहे.