Wednesday, June 7, 2023

दर्ग्याला दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून दागिने केले लंपास

औरंगाबाद : खुलताबाद येथील दर्गा येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरट्यानी डल्ला मारला आहे. चोरट्यानी घरातून एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.

हिलाल कॉलनी येथील गुलाम अहेमद खान हे त्यांच्या कुटुंबियांसह शनिवारी दुपारी ३ ते रात्री ८ वाजेदरम्यान खुलताबाद येथे गेले होते. घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यानी कुलुप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यानी लंपास केले.

त्यात तीन तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळा सोन्याची अंगठी आणि चार ग्रामचे कानातले चोरी झाले आहेत. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोडखे करत आहे.