घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : सातारा परिसरात दोन घरे फोडून चोरांनी 23 हजाराचे दागिने लंपास केले. पहिली घटना कांचनवाडी भागात घडली. कामगाराचे घर फोडून चोराने सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

रघुवीर मधुकरराव कुकलकर (36, रा. कांचनवाडी) हे 12 जून रोजी अमरावती येथील मुळगाव अंजनगाव, सूरजी येथे गेले होते. त्याची संधी साधून चोराने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरुममधील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये असलेले सोन्या-चांदीचे वीस हजाराचे दागिने लांबवले. हा प्रकार उघडकीस आल्यावर कुकलकर यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर सोमवारी दुपारी बारा ते चारच्या सुमारास गोलवाडी भागातील दिशा संस्कृती सोसायटीतील महिला घराला कुलूप लावून बाजारात खरेदीसाठी गेली होती.

त्यादरम्यान, चोराने दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील तिजोरीमध्ये ठेवलेली तीन हजाराची सोन्याची नथ भरदिवसा लांबवली. या दोन्ही प्रकरणांचा तपास उपनिरीक्षक मारुती दासरे करत आहेत.

Leave a Comment