नवरीला घरी आणण्यासाठी नवरा बनला पेशंट; अ‍ॅम्ब्युलन्स मधून केला ८० कि.मी. चा प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरूच आहे.दरम्यान,सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी आहे.मात्र तरीही काही लोक या नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत अशातच प्रशासन लोकांना सोशल डिस्टंसिंग करण्याचे आवाहन करत आहे. अशातच एक घटना समोर आली आहे हि घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरची आहे,जेथे एका कुटुंबाने पहिले पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी रूग्णवाहिका घेतली. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाविरूद्धही गुन्हा दाखल केला आहे.

नवरदेवाने वधूला रुग्णवाहिकेतून आणले
मुझफ्फरनगरमधील खतौली येथे राहणाऱ्या या नवरदेवाने आपल्या वधूला आणण्यासाठी निवड करण्यासाठी अ‍ॅम्बुलन्समधून ८० किमीचा प्रवास करून गाझियाबाद गाठले.संपूर्ण महामार्गावर असलेल्या पोलिस पॉइंट्सवर रुग्णवाहिका असल्यामुळे पोलिसांनी तपासणी केली नाही.लग्नानंतर नवरदेव रुग्णवाहिका घेऊन खतौलीला पोहोचले.रुग्णवाहिकेत वधू-वर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ९ लोक होते.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला वधूबरोबर क्वारंटाइन केले आहे.पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाविरूद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे.तसेच त्याच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाइन केले आहे.

How a village in West Bengal campaigned to get its own ambulance ...

प्रयागराजमध्येही केले लग्न,गुन्हा दाखल
कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाउन दरम्यान कोणत्याही प्रकारच्या समारंभावर बंदी घालण्यात आली आहे.अलीकडेच प्रयागराजच्या किडगंज भागात सरकारी आदेशाचे उल्लंघन करत लग्न झाले होते.याप्रकरणी पोलिसांनी कठोर पवित्रा घेत वधू-वराविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. वधू -वराच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यूपीमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे
उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.उत्तर प्रदेशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दोन हजारांच्या पुढे गेलेली आहे. प्रधान सचिव अमित मोहन प्रसाद यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात आतापर्यंत २११५ संक्रमित रुग्ण आढळले असून त्यापैकी १६०२ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत हे संक्रमण ६० जिल्ह्यात पसरले आहे तसेच ७ जिल्ह्यात सक्रीय संसर्गग्रस्त रुग्ण नाहीत.आतापर्यंत ४७७ रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना सोडण्यात आले आहे,तर कोरोनामुळे ३६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment