धक्कादायक ! पती पत्नीने दिला खोल दरीत उडी मारून जीव

1
43
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी |आशिष गवई ,

घरगुती वादातून पत्नी तीन आठवड्यांपासून माहेरी गेली, पतीने तिला समजावून दुचाकीवर आणले आणि दोघांनी पर्यटनस्थळावरील प्रसिद्ध असलेल्या भीमकुंड दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 8:30 वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली आहे, यात एक वर्षाचा चिमुकला मात्र घरी असल्यामुळे बचावला.

गणेश झगुजी हेकडे (वय 25), राधा गणेश हेकडे (वय 22, रा. शहापूर) असे दरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या पती-पत्नींची नावे असून त्यांना एक वर्षाचा बजरंग नामक मुलगा आहे, त्यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते, गणेश हा कुस्तीपटू असल्याची माहिती असून अमरावती जिल्ह्यात त्याचा प्रथम क्रमांक आला होता. तो हव्या प्र. मंडळाचा विद्यार्थी होता, घरगुती वादातून तीन आठवड्यांपूर्वी रागाने राधा माहेरीनजीकच्या मोथा गावी गेली होती, गणेशने काही दिवसांपूर्वीच मुलाला घरी आणले होते, सततच्या वादातून कंटाळल्यामुळे त्याने बुधवारी सकाळी मोथा येथे सासरी जाऊन राधाला दुचाकीवरून आणले, यादरम्यान दोघेहीभीमकुंड दरीत जाऊन आत्महत्या करणार असल्याचं त्यांनी राधाच्या काकांना सांगितल्यामुळे काका सुदेश महादेव निखाडे लागलीच त्यांच्या मागावर गेले. त्यानंतर काकांना दोघेही शहापूर येथे गेले नसल्याचं कळल्यामुळे चिखलदरा पोलिसांत त्यांनी तक्रार दिली.

पोलिसांनीही तात्काळ भीमकुंड पॉइंट वर जाऊन पाहणी केली असता दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चिखलदरा चे ठाणेदार आकाश शिंदे सह सहकारी दरीतून मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here